तुळजापूर  / प्रतिनिधी-

 सोलापूर  येथील शिवलाड समाजाच्या दोन काट्यांचे तिर्थक्षेञ तुळजापूरात अश्विनी पोर्णिमा दिनी दुपारी दीड वाजता आगमन होताच काठ्यांचे पुजन देविचे भोपे पुजारी सचिन पाटील त्यांच्या सौभाग्यवती प्रियंका चिरंजीव अर्थव कार्तीक या पाटील कुटुंबानी केले.

   या काठ्यांना विजयध्वज असेही म्हटले जाते . या काठ्या सुमारे २५ फूट उंचीच्या असून , यातील एक काठी आगळ्या वेगळ्या पध्दतीने देवीच्या छबिन्यासमोर मिरवतात. काठ्यांना आकर्षक असे फुलांनी व विद्यूत रोषणाईने सजविले जाते. छबिन्यासमोर या काठ्यांना मोठा मान आहे . या काठ्याशिवाय दुसरे कोणतेही वाहन अथवा साधन आणले जात नाही . छबिन्यासमोर आग्रभागी राहण्याचा मान सोलापूर येथील काठ्यांना असतो . यामुळे अाश्विनी पौर्णिमेला सोलापूर परिसरातील शिवलाड समाजासह भाविक मोठ्या संख्येने तुळजापुरात दाखल होतात .


 
Top