तुळजापूर  / प्रतिनिधी-

 शारदीय नवरात्र उत्सवात राष्ट्रीय अपराध जांच ब्युरोचे राष्ट्रीय संचालक सुरेशकुमार शुक्ला दिल्ली यांच्या आदेशानुसार तुळजाभवानी मंदिर आणि परिसरात पंधरा दिवस बंदोबस्त करण्याचे नियोजन करण्यात आले.

 तुळजाभवानी मंदिर प्रशासकीय कार्यालयात जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळें यांनी महाराष्ट्र राज्य संचालक चंद्रशेखर धोत्रे यांचा सत्कार करून बंदोबस्ताला सुरुवात केली.

भारतात यात्रा उत्सव काळात राष्ट्रीय अपराध जांच ब्युरो पोलीस प्रशासनाला मदत करण्याच्या उद्देशाने कायम सहकार्य करत असते. ज्या ठिकाणी जास्त गर्दी होत होती त्या ठिकाणी गर्दी कमी करण्याचे काम व्यवस्थित पार पाडल्यामुळे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि तत्कालीन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी NCIB चे कौतुक केले, बंदोबस्त साठी उप विभागीय पोलीस अधिकारी सई भोर - पाटील यांनी बंदोबस्त चे नियोजन केले. तहसीलदार सौदागर तांदळे, पोलीस निरीक्षक आदिनाथ काशीद, तहसीलदार तथा व्यवस्थापक योगिता कोल्हे यांनी बंदोबस्तसाठी आलेल्या NCIB च्या सर्व अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. मुंबई, नवी मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर, लातूर उस्मानाबाद,  महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून बंदोबस्त साठी एकून आकरा अधिकाऱ्यानी जबाबदारी पार पडली.

राज्य संचालक चंद्रशेखर धोत्रे, राज्य जनसंपर्क अधिकारी संजय रोडे, लातूर अपराध सूचना अधिकारी शिरीषकुमार शेरखाने, लातूर अपराध सूचना अधिकारी बसवेश्वर पसारे, पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष जाधव,  उस्मानाबाद अपराध सूचना अधिकारी संजयकुमार बोंदर, कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी अमोल पल्लखे, पुणे अपराध सूचना अधिकारी अनिल टपके, नवी मुंबई अपराध सूचना अधिकारी आनंद महाजन, पुणे अपराध सूचना अधिकारी विशाल दळवी, सदस्य नागरिक हक्क सुरक्षा परिषद मंजूनाथ कोपर्डे उपस्थित होते.


 
Top