तुळजापूर/ प्रतिनिधी-

महाराष्ट्राचीकुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीत  सोमवार दि २४रोजी   अश्विनीअमावस्याचा सांयकाळी आगीची ज्वाला अंगावरुन वाहुन नेला जाणारा  थरारक असा भेंडुळी उत्सव आईराजाउदो कालभैरव टोलभैरवाचा चांगभले च्या गजरात संभळाचा कडकडाटात  पारंपरिक पध्दतीने पार पडला.

 सोमवार दि.२४रोजी नरकचतुर्थी निमित्ताने श्रीतुळजाभवानी मातेस  पहाटे प्रथम अभ्यंगस्नान घालण्यात येवुन नंतर शुध्दस्नान घालुन भाविकांच्या पंचामृत अभिषेक पुजा करण्यात आल्यानंतर देविजीस वस्ञोलंकार घालुन धुपारती करण्यात आली.आज दिवसभर भाविकांनी देविदर्शनार्थ मोठी गर्दी केली होती.

आज अश्विनी अमावस्या पार्श्वभूमीवर डोंगर कड्यावर असणाऱ्या श्रीकाल भैरवास सकाळी तेलाचे अभिषेक करण्यात आले नंतर दुपारी भेंडुळी तयार करण्यात आली.

सांयकाळी कालभैरव पुजारी श्रीतुळजाभवानी मंदीराचे धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक विश्वास कदम जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे यांच्या उपस्थितीत देविचा  पोताने भेंडुळी प्रज्वलित करण्यात आल्यानंतर ही पेटलली भेंडुळी युवकांनी खांद्यावर घेवुन कालभैरव मंदीरातुन कड्यावरील पायऱ्या उतरत मठाजवळ येताच येथे महंत हमरोजी बुवा, गुरुचिलोजी बुवा व महंत वाकोजी बुवा, गुरु तुकोजीबुवा यांनी प्रथम भेंडुळीवर तेल ओतुन पुजा करुन मनोभावे दर्शन घेतले. नंतर  अन्नपुर्णा मठा समोरील  असणाऱ्या सवा फुट  अडचणीचा बोळातून सहजपणे शिवाजी दरवाजा मार्गे आई तुळजाभवानी मंदीरातील सिंह गाभाऱ्यात नेवुन तेथे प्रदक्षणा मारुन भवानीशंकर मंडपातुन मंदीर बाहेर आणण्यात आल्यानंतर  .मंदीरातील श्रीदत्तमंदीर समोर महंत मावजीनाथ महाराज  या भेंडुळी चे विधीवत  पुजन करुन मनोभावे दर्शन घेतले .

  त्यानंतर राजेशहाजीमहाध्दार मधुन कमानवेस भागातील डुल्या मारुती मंदीरात आल्यानंतर येथे.मंदीराच्या पारावर अहिल्यादेवी होळकर विहीरीतील पाण्याने ही भेंडोळी शांत ( विझवली ) केली जाते .  त्यानंतर देविजींना दही, दुध, पंचामृत अभिषेक करण्यात आले.


 
Top