वाशी / प्रतिनिधी-

 राज्य शासनाने गेल्या काही दिवसात सर्व शिधापत्रिका धारकांना दिवाळी पूर्वी आनंदाचा शिधा दिवाळी भेट म्हणून १०० रुपयात एक किलो साखर ,१ लिटर पामतेल ,एक किलो रवा ,एक किलो चणाडाळ  देण्याचे घोषित केले होते .आनंदा चा शिधावाटप कार्यक्रमाचा शुभारंभ वाशी येथील रास्त भाव दुकानदार बाळसाहेब सुकाळे यांच्या दुकानातून बाळासाहेबांची शिवसेना नेते प्रशांत चेडे यांच्या हस्ते तर रास्त भाव दुकानदार काझी यांच्या दुकानात बाळासाहेबांची शिवसेना तालुका संघटक तथा नगरसेवक शिवहार स्वामी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा कीट वाटप करण्यात आले . यावेळी गट नेते नागनाथ नाईकवाडी ,माजी नगरअध्यक्ष नितीन चेडे ,नगरसेवक तथा तालुका संघटक शिवहार स्वामी रास्त भाव दुकानदार बाळासाहेब सुकाळे ,बबलू काझी ,पिंटू भांडवले ,राम महामुनी ,काकासाहेब कवडे यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते .


 
Top