परंडा / प्रतिनिधी -

परंडा तालुक्यातील शेळगाव येथील खैरी नदीवरील पूल गेल्या महिनाभरापासून पाण्याखाली आहे त्यामुळे पंचक्रोशीतील व तांदूळवाडीकरांना येजा करण्यासाठी बंधाऱ्याचा आधार घ्यावा लागतो याच बंधाऱ्याहून ये जा करताना जीव मुठीत धरून तारेवरची कसरत करत मोटार सायकल वरून प्रवास करावा लागत आहे.त्यामुळे ही बिकट परिस्थिती लक्षात घेऊन तांदुळवाडी येथील स्वयंसेवक तरुणांनी एकत्र येऊन जेसीबीच्या सहाय्याने मुरूम टाकला आणि रात्रीच्या दरम्यान  येजा करण्याच्या रस्त्यावर मुरूम टाकला,हा रस्ता बनवल्या ने तांदूळवाडीकरांना येजा करण्यासाठी तात्पुरती सोय झाली आहे

यासाठी तांदुळवाडी येथील अनेक तरुणांनी परिश्रम घेतले.परंतु वास्तविक पाहता शेळगाव येथील पुलाची उंची वाढवण्यात यावी हीच मागणी शेळगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे.

प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन पुलाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे

 
Top