नळदुर्ग / प्रतिनिधी-

  नळदुर्ग येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नळदुर्ग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या म्हैस पळविणे व किल्ला बांधणी या अनोख्या स्पर्धा उत्स्फुर्त प्रतिसादाने मोठ्या उत्साहात पार पडल्या . या दोन्ही स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

          नळदुर्ग येथे वर्षातील सर्वात मोठा सण असणाऱ्या दिवाळीमध्ये पाडव्यानिमित्ताने म्हैस पळविण्याची परंपरा  तब्बल पंच्याहत्तर वर्षांपासुन शहरातील गवळी समाज व पशुपालकांनी कायम ठेवली असुन  म्हैस पळविण्याच्या या अनोख्या स्पर्धेत सालाबादप्रमाणे शिवसेनेच्या पुढाकाराने नळदुर्ग या ऐतिहासिक शहरात नळदुर्ग , केशेगाव , अणदूर , बोरगाव , इटकळ, मैलारपूर , जकनी तांडा, वसंतनगर मुर्टा आदीसह  विविध भागातील पशुपालक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता .याशिवाय महाराष्ट्रासह देशाची अस्मिता असलेल्या महाराष्ट्रातील गड किल्ले बांधणी स्पर्धेत शहरातील युवक व बाल कलाकारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल इतिहासचे दर्शन घडविले. सांघीक म्हशी पळविण्याच्या स्पर्धेतील विजेते स्पर्धक अजय जाधव ( प्रथम ) ,महेश जळकोटे ( द्वितीय ) , नागनाथ कलशेट्टी (तृतीय) , वैयक्तिक स्पर्धेत पप्पू भुमकर ( प्रथम ) ,लक्ष्मण सापळे ( द्वितीय ) , मोटार सायकल सोबतच्या स्पधेत जफर टेलर ,राजू कुरेशी ,   गुंडू भुमकर , राजु कुरेशी या विजेत्या ठरलेल्या पशुधन पालक शेतकर्यांना तर किल्ला बांधणी स्पर्धेत प्रथम क्रमांक राजमुद्रा ग्रुप भोई गल्ली नळदुर्ग द्वितीय विश्वजीत मुळे व अनिल मोरे आणि तृतीय श्रीपाद राजेंद्र पुदाले तर उत्तेजनार्थ मराठा गल्ली येथील कृष्णा कदम व राघव येडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या विजेत्यांचा आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमात रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .या म्हैस पळविण्याच्या स्पर्धा सांघिक व मोटार सायकल सोबत म्हैस पळविणे आणि वैयक्तिक अशा तीन गटात घेण्यात आल्या होत्या .या  कार्यक्रमास शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण ,शिवसेनेचे शहर प्रमुख संतोष पुदाले , सरदारसिंग ठाकूर , बलदेव ठाकूर , बसवराज धरणे , संजय जाधव ,नितीन कासार , डॉ .जितेंद्र पाटील , सोमनाथ मेहत्रे ,नवल जाधव , ओंकार कलशेट्टी ,प्रवीण चव्हाण , राजेंद्र ठाकुर , दयानंद घोडके , किल्ला बांधणी स्पर्धेचे परीक्षक डी. एस . वाघमारे ,बाळासाहेब महाबोले , भैरवनाथ कानडे , डॉ . संतोष पवार आदींची उपस्थिती होती . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष पवार यांनी तर आभार प्रदर्शन सरदारसिंग ठाकुर यांनी केले .

 
Top