उस्मानाबाद / प्रतिनिधी- 
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ही २०२० चा पीक विमा बजाज अलाईन्स कंपनी देत नसल्यामुळे गेल्या पाच दिवसापासून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अामदार कैलास पाटील अमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्याची सकाळी वैद्यकीय पथकाने तपासणी केली असता. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लाकाळ यांनी माध्यमांशी बोलताना आमदार कैलास पाटील यांचे पाच किलो वजन कमी झाले असून त्याच्या शरीरातील किटनेस कमी झाले आहे. त्यामुळे यांची प्रकृती बिघडली आहे. दरम्यान वैद्यकीय पथकाने दर दोन तासाने उपोषणकर्ते विधायक कैलास पाटील यांची तपासणी केली असता त्याची प्रकृती गंभीर असल्याचा रिपोर्ट डाॅ. लाकाळ यांनी जिलाधिकारी यांना आज  दिला आहे. 
 हे आंदोलन आक्रमक करण्यासाठी रस्ता रोको, मातीत गाढुन घेने, त्याचबरोबर शुक्रवारी सकाळी कांही शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर चढले. तर पाडोळी परिसरात कांही शेतकऱ्यांनी नदीत उतरून नदीच्या पाण्यात उतरून पीक विम्याबाबत घोषणाबाजी केली. त्यामुळे प्रशासन सतर्क होऊन िजल्हाधिकारी यांनी आमदार कैलास पाटील यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेऊन चर्चा केली.  यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, संपर्क नेते शंकरराव बोरकर आदी उपस्थित होते. 

अामदार पाटील यांच्या आंदोलनाला ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.  आंदोलनकर्त्यांनी प्रशासनासोबत आमचा वाद नाही, सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर ही कंपनी का ऐकत नाही, त्यावर वाद असल्याचे सांगितले.गेल्या चार महिन्यात अितवृष्टीमुळे पीके हातची गेल्यामुळे ३९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या २०२० चा पीक विमा नाही, आतिवृष्टीचे अनुदान नाही या सर्व प्रकारामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.

२७ ऑक्टोबर रोजी आळणी येथे शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला. तर सारोळा गावातील कांही लोकांनी स्वत:ला जमिनीत गाढून घेतले. अखेर प्रशासनाच्या वतीने तहसीलदार यांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची िवनंती केल्यानंतर हे आंदोलन समाप्त झाले. तर शुक्रवार २८ ऑक्टोबर रोजी कांही शेतकरी िजल्हाधिकारी कार्यालयावर चढून त्यांनी पीक विमा मिळण्याबाबत घोषणाबाजी केली. यावेळी उपविभागीय अिधकारी खरमाटे, तहसीलदार माळी यांनी अखेर प्रयत्न करून आंदोलकांना शांत करत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर नेहले. या आंदोलनादरम्यान शिवसैनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, संपर्क नेते शंकरराव बोरकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. या आंदोलनाला ३५० पेंक्षा जास्त ग्रामपंचायतींनी तर शंभर सहकारी सोसायट्या व ८० पेंक्षा जास्त  राजकीय, सामाजिक संघठनांनी पाठींबा दिला आहे. 
  आंदोलनस्थळी भाऊबीज
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हक्काच्या पीक विमा अनुदान, नुकसानभरपाईसाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण सुरु केलं आहे.   या आंदोलनाला पाठिंबा म्हणून काही महिलांनी उपोषणस्थळी कैलास पाटील यांचं औक्षण करुन भाऊबीज साजरी केली. यावेळी उपनेत्या सुषमा अंधारे, महिला आघाडीच्या शामल पवार यांच्यासह महिलांनी अामदार कैलास पाटलांचे औक्षण केले. 



 
Top