तेर / प्रतिनिधी-

संतांचे विचार रूजविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विद्यानंदजी सागर महाराज   यांनी व्यक्त केले.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते त्यावेळी  बोलत होते.अध्यक्षस्थानी ह.भ.प.विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांत चे अध्यक्ष महेंद्र बारगजे होते तर देवगिरी प्रांत चे धर्माचार्य संपर्क प्रमुख ह.भ.प.डाॅ.जनार्धन मेटे,   महंत मावजीनाथ ,ह.भ.प.महेश महाराज कानेगावकर,ह.भ.प.रघुनंदन महाराज पुजारी,तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह.भ.प.दिपक महाराज खरात यांनी केले तर   सूत्रसंचालन नंदकुमार कोनाडे  तर आभार गजानन चौगुले यांनी मानले.यावेळी श्रीकृष्ण धर्माधिकारी, दत्तात्रय पांचाळ, सुधाकर बुकन, विलास फंड,काकासाहेब मगर, श्रीमंत फंड व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


 
Top