उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली   काँग्रेस आय पक्षाचे जिल्हा सरचिटणीस तथा काँग्रेस सेवादलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव  संजय  घोगरे, कळंब यांनी काँग्रेस च्या अनेक आजी -माजी पदाधिकाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.  यामध्ये प्रामुख्याने कालिदास वीर आळणी., सुनील पाटील शिराढोण,  संतोष भांडे कळंब,  दामोदर शिंदे सर कळंब,   तय्यब हाश्मी बोरवंटी,   बालाजी कटकुरे ताडगाव, अँड.  बाळासाहेब लोमटे जवळा,  आबासाहेब देशमुख, गौर,  सचिन मडके सर, मोहा, प्रेमचंद कांबळे, मंगरूळ,  प्रशांत घोगरे, कळंब, अमोल घोगरे, एकुरका, सागर घोगरे,  अनिकेत पारवे,   वैभव लोहार,  यश घोगरे, धीरज घोगरे यांचा समावेश आहे.

  यावेळी भाजपचे जिल्हा संयोजक नितीन पाटील, तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, अरुण चौधरी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रशांत लोमटे आदी उपस्थित होते.


 
Top