परंडा/ प्रतिनिधी -

 तालुक्यातील भोंजा हवेली येथे खरीप हंगाम पिक विमा २०२० मधील शेतकऱ्यांनची यादी प्रसिद्ध करून यादीतील शेतकरी बंधू यांनी नाव पिक अकाऊंट नंबर आणि भरलेल्या पिकांचे क्षेत्र बरोबर आहे ही खात्री करून घेतली ही यादी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय उस्मानाबाद येथून गावनिहाय तयार केलेली आहे .

सध्या या यादीत सोयाबीन पिकाची १ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर २०२० रोजी शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पिक नुकसान झाले म्हणून बजाज अलायन्स कंपनी कडे तक्रार केली होती.अशा शेतकरी बंधू भगिनींनची पहिला यादी सध्या प्रशिध्द केली होती उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही पीक विमा मिळणार आहे. गैरसमज करू नये यादीत नाव नाही हा संभ्रम दूर करून दुसरी यादी वरिष्ठ लवकरच गाव निहाय प्रशिध्द करणार आहेत यावेळी तहसील कार्यालय चे पुरवठा अधिकारी भाऊसाहेब नेटके, शेतकरी शिध्देश्वर मोरे, डायरेक्टर गणेशदादा नेटके, विकास भांदुर्गे, बिरमल कोंडलकर, प्रदिप नेटके, राजाभाऊ मोरे, गोकुळ मोरे, प्रफुल्ल मोरे, केशव पोळके,बळी निळ आदि शेतकरी उपस्थित होते.

 
Top