आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणाला अंशतः यश – खा. ओमराजे निंबाळकर


उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शेतकऱ्यांचा हक्काचा पीकविमा व अनुदान तातडीने मिळावे यासाठी आमदार कैलास पाटील यांच्या चालू असलेल्या उपोषणाला आज सहावा दिवस आहे.  दि. 28 ऑक्टोंबर रोजी दुपारी जिल्हाधिकारी श्री. सचिन ओंबासे यांनी आमदार कैलासदादा पाटील यांची उपोषण स्थळी भेट घेऊन आंदोलन थांबविण्याची विनंती करून तासभर खुली चर्चा केली. उपोषणाला सुरुवात केल्यानंतर प्रशासनाला 2020 मधील संपूर्ण विमा पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार कराव्यात अशी मागणी केली होती (3 लाख 57 हजार पेक्षा जास्त शेतकरी) त्यामुळे प्रशासनाकडून काल 2020 च्या खरीप हंगामात पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या सुधारित याद्या जाहीर करणार असल्याचे उपोषण स्थळीच जाहीर केले होते.

 त्यानुसार गावनिहाय पात्र शेतकऱ्यांची सुधारित यादी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ठिकाणी, मोबाईल वर, पाठविण्याच्या सूचना खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी केल्या होत्या. प्रशासनाने तशी कार्यवाही केली जाईल, असा शब्द  जिल्हाधिकारी महोदयांनी दिला होता.

 त्यानुसार जिल्ह्यातील 2020 साली खरीप हंगामात विमा हप्ता भरलेल्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या ग्रामपंचायतीत ही यादी लावली गेली का ? त्यात आपले नाव आहे का ? याची खात्री करून घ्यावी. त्यात काही गडबड, चूक असल्याचे दिसल्यास ते निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन जिल्हा शिवसेने च्या वतीने करण्यात आले आहे.

 शेतकऱ्यांच्या हक्का साठी सुरू असलेल्या आंदोलना मुळे जिल्हयातील निम्या पेक्षा जास्त संख्येने (1 लाख 77 हजार पेक्षा जास्त) शेतकऱ्यांची नावे सुधारित यादीत नव्याने समाविष्ट झाली आहेत. शेतकऱ्यांचा वाढता पाठींबा मिळत असल्याने मागण्या मान्य करण्याकडे प्रशासनाने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. पण शेतकऱ्यांनी आता विमा कंपन्या बाबत, आपल्या भरलेल्या विमा हप्त्या बाबत, मिळना-या विमा रकमेबाबत जागरूक राहने गरजेचे आहे.


 
Top