उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  मुख्यमंत्री  एकनाथ  शिंदे  यांच्या आदेशाने ! शिवसेना प्रवक्ते, नेते, उपनेते, शिवसेना कार्यकारिणी आणि  आरोग्यमंत्री तानाजी सावंत  यांच्या मार्गदर्शनात तसेच  खा. डॉ श्रीकांत शिंदे  यांच्या निरीक्षणात   युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.  यात युवासेना कार्यकारिणीवर अविनाश खापे पाटील यांची निवड करण्यात आली. 

कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आणि चळवळीतील युवकाला ही जबाबदारी देण्यात आली त्याबद्दल समर्थकांकडून सर्वत्र अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यात आल्या. 

येणाऱ्या काळात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी ज्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे   हे सत्तेच्या माध्यमातून जनसामान्यांची कामे करत आहेत अगदी त्याचप्रमाणे पक्ष संघटनेने दिलेली जबाबदारी ही जनतेची कामे करत पक्ष संघटन पुढे घेऊन जाण्यासाठी कायम कार्यतत्पर राहून पार पाडू अशी भावना अविनाश खापे पाटील यांनी व्यक्त केली

 
Top