तुळजापूर  / प्रतिनिधी-

महाराष्ट्रातील सौर ऊर्जा प्रकल्प राबवणाऱ्या नगर परिषद शाळा क्र.3 तुळजापूर (खुर्द) शाळेस महाराष्ट्रातील आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटिल यांनी भेट दिली.

 महाराष्ट्रातील आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटिल यांची नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 तुळजापूर (खुर्द) शाळेला दुसऱ्यांदा भेट  शाळेतील स्मार्ट इंटरॅक्टिव्ह

बोर्ड,संगणक कक्ष, मिनी सायन्स लॅब, सौर ऊर्जेवर चालत असल्याचे पाहून ,शाळेतील विद्यार्थी सोबत हितगुज केले तसेच औरंगाबाद विभागात गुणवत्ता विकास कार्यक्रम मध्ये उत्कृष्ट शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल मराठवाड्यातील पहिली ISO मानांकन प्राप्त पहिली शाळा असल्याबद्दल  भास्कर पेरे पाटलांनी समाधान व्यक्त केले. 

  याप्रसंगी नगर परिषदेच्या माजी शिक्षण सभापती  मंजुषा  देशमाने,   पंडितराव जगदाळे, .राजाभाऊ देशमाने यांच्या हस्ते  भास्कर पेरे पाटिल यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम मोटे, शिक्षक  अशोक शेंडगे,  जालिंदर राऊत, सतीश यादव,  विश्वजीत निडवंचे,  रवीकुमार पवार तसेच तुळजाई नागरी सहकारी पतसंस्थेचे सचिव  संजय ढवळे, हनुमंत पुजारी, अरविंद ढगे यांची उपस्थिती होती.


 
Top