तुळजापूर/ प्रतिनिधी-

तालुक्यातील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तामलवाडी येथे आकाश कंदील तयार करण्याची कार्यशाळा संपन्न झाली.

या कार्यशाळेत  विद्यार्थ्यांनी आकर्षक आकाश कंदील व भेटकार्ड तयार करून आपल्या कल्पकतेचे सादरीकरण केले.  यावेळी फटाकेमुक्त  दिवाळी साजरी करण्याचा संदेशही देण्यात आला.  रांगोळी -दिव्यांची आरासही करण्यात आली होती. कार्यानुभव या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी बनविलेल्या आकाश कंदीलाची भेट अनेकांना दिल्या.

 
Top