तुळजापूर  /  प्रतिनिधी -

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सवातील सातव्या माळे दिनी  रविवारच्या सुट्टीच्या  पार्श्वभूमीवर तिर्थक्षेञी देवी दर्नशनार्थ भाविकांची मोठी गर्दी केल्याने  तिर्थक्षेञ हाऊसफुल्ल झाले होते.

 आज तिर्थक्षेञ तुळजापूरात जिकडे बघावे तिकडे  भाविक व  वाहनेच दिसत होते. मंदीरासमोर तर मुगी जायला जागा नव्हती. घाटशिळ व मंदीर दर्शन मंडप,रस्ते चारी बाजूचे वाहनतळ, धर्मशाळा लाँजेस, विश्राम धाम  हाऊस फुल्ल झाले होते. 

 

महाद्वारा समोरील गर्दी हटेना !

 महाद्वारा समोर भाविक  सेल्फी फोटो काढण्यासाठी थांबत असल्याने  येथे  भाविकांची गर्दी होवुन देविदर्शन करुन बाहेर जाणाऱ्या  भाविकांना बाहेर पडण्यासाठी मोठा ञास सहन करावा लागत आहे.

या गर्दी चा लाभ काही भाविक  येथे श्रीफळ वाढवुन घेत आहेत.   गर्दी हटविण्या बाबतीत पोलीस अपेक्षित कर्तव्य बजावत नसल्याने येथे सातत्याने एकच गर्दी होत आह.े हा परिसर चोरट्यांनसाठी पोषक ठरण्याची शक्यता आहे. 


 हाऊसफुल्ल

 घाटशिळ व मंदीर दर्शन मंडप भाविकांनी भरुन जावुन दर्शन रांग भवानी रोडवरील दिपक चौकापर्यत आली होती . चारी बाजूचे वाहनतळ वाहनांनी खच्चुन भरले होते.  प्रथमच नळदुर्ग  रोडवरील हेलिपँड वाहन   तळ वाहनांनी खच्चुन भरुन गेले होते. वाहने  रस्त्यावर लावावी लागली होती. एवढी वाहने आज शहरात आली होती.  धर्मशाळा लाँजेस विश्रामधाम येथे खोल्या शिल्लक नव्हत्या. आज  प्रथमच ख-या अर्थाने तुळजापूर हाऊस फुल्ल झाले होते.


 
Top