उस्मानाबाद  /  प्रतिनिधी - 

कोविडच्या कालावधी पासून उस्मानाबाद जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थाची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. मजूर संस्थांची परिस्थिती सुधारण्यासाठी जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर पंचायत अशा शासनाच्या विविध विभागांकडून मजूर संस्थांना कामाचं वाटप होत नाही त्या कामाचं वाटप होण्यासाठी तसेच सध्या ऑनलाईन पद्धतीने संस्थांना शासनाकडून 30 लाखापर्यंत ची कामे मिळत असून ऑफलाईन पद्धतीने 25 लाखा पर्यंतची कामे मिळावेत यासाठीही शासनस्तरावर जिल्हा मजूर फेडरेशनच्या वतीने जिल्ह्याचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा करणार असल्याची माहिती संघाचे चेअरमन नारायण नन्नवरे यांनी दिली.

 संघाच्या उस्मानाबाद शहरातील स्वस्तिक मंगल कार्यालय येथे  आयोजित केलेल्या 38 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जीवन बरडे,  संघाचे संचालक गफार काझी, शंकर वाघमारे,तात्यासाहेब गोरे, साहेबराव पाटील,  हरिश्चंद्र मिस्किन नागनाथ पवार, धनंजय हांडे, बिलाल तांबोळी, मनीषा पाटील यांच्यासह आजी -माजी संचालक होते. वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व विषयांना एक मताने मंजुरी देण्यात आली सभेस जिल्हाभरातून मजूर सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते सभेच्या यशस्वीतेसाठी संघाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 
Top