उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील शांती निकेतन सोसायटी भानुनगर येथे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व गायक किशोर कुमार यांच्या पुण्यतिथीनिमित्त हौशी छंदी मेलडी स्टार समुहाच्या गायन अभिवादनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रथम किशोर कुमार यांच्या प्रतिमेस उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी श्री शेख   , मेलडी स्टार समुहाचे मुख्य प्रवर्तक युवराज नळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर त्यांनी गायलेली गीतांचे गायन करण्यात आले. 

यामध्ये जेष्ठ विधिज्ञ दिपक मेंढेकर , विधिज्ञ सौ. दलभंजन , युवराज नळे ,तौफिक शेख , अभिजीत शेळके , शरद वडगावकर, पोलिस अधिकारी शेख ,प्रगती शेरखाने , अमृता देशपांडे , सुशील कुलकर्णी,श्री.सस्ते, मुनीर शेख , धनंजय कुलकर्णी , मुकुंद पाटील मेंढेकर यांनी गायन केले. या कार्यक्रमासाठी श्री दलभंजन , सौ. वर्षा युवराज नळे,सौ. पाटील मेंढेकर उपस्थित होते.  

 
Top