तेर / प्रतिनिधी-

  रिलायन्स फाऊंडेशन व  कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर अंतर्गत डिजिटल फार्म स्कुलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कापूस पीकातील कीड ,रोग व खत व्यवस्थापन विषयावर नितळी येथे मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली.                    

  शेतकऱ्यांना कापूस पिक रोग व  खत व्यवस्थापन कसे करायचे या संबंधी बरेच प्रश्न आहेत त्यामुळे या प्रश्नाचे निराकरण करण्याचा उद्देशाने रिलायंस फॉउंडेशन माहिती सेवा व कृषी विज्ञान केंद्र यांनी  उस्मानाबाद जिल्यातील नितळी येथील शेतकऱ्यांसाठी कापूस पिकातील रोग व खत व्यवस्थापन या कार्यक्रमाचे आयोजन केले. 

कार्यक्रमामध्ये कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील विषय विशेष तज्ञ  डॉ. कृष्णा झगडे  यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये कापूस बोंड  अळी, मावा तुडतुडे, सूक्ष्म अन्नद्रव्य नियोजन इत्यादी विषयीचे व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना त्यांच्या प्लांट डायग्नोस्टिक कॅम्प द्वारे  च्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमामध्ये गावातील कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन मनोज काळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेणुका राऊत यांनी प्रयत्न केले. 


 
Top