कळंब/ प्रतिनिधी-

 विजया रामकृष्ण लोंढे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित केलेल्या मोफत कॅन्सर शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला. शिबिराचे हे आठवे वर्ष आहे. 

विजया नर्सिंग होम, रोटरी क्लब कळंब सिटी, इंडियन मेडिकल असोसिएशन कळंब शाखा आणि ईनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित केले होते. येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात हे शिबीर बुधवार दि १२ आक्टोबर २२ रोजी घेण्यात आले. यामध्ये ३२ पेशंटस् ची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ११ महिलांचे टेस्ट स्वॅब घेण्यात आले. या शिबिरात दोन पेशंट ला तोंडाच्या संभाव्य प्राथमिक अवस्थेतील कॅन्सर दिसून आला. त्यांना पुढील टेस्ट साठी नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे बोलावण्यात आले असून तेथे त्यांचेवर मोफत औषधोपचार केले जाणार आहेत. 

यावेळी रोटरी अध्यक्ष डॉ सचिन पवार, ईनरव्हील सचिव डॉ मिनाक्षी भवर, डॉ रामकृष्ण लोंढे, डॉ सत्यप्रेम वारे यांनी विचार मांडले. लवकरच सर्वाव्हल कॅन्सर विरोधी प्रतिबंधक लस ९ ते २६ वर्ष वयोगटातील मुली व युवतींना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती अभियान राबविण्यात येणार असून लसीकरण करणार आहोत असे डॉ रामकृष्ण लोंढे यांनी सांगितले. यासाठी आय एम ए पुढाकार घेणार असुन शासकीय यंत्रणे बरोबर , रोटरी, लायन्स, ईनरव्हील क्लब या सारख्या संस्था सहभागी होणार आहेत. ही लस लवकरच सिरम कंपनी तर्फे २०० ते ४००₹ बाजारात उपलब्ध होत आहे. तसेच ही लस मुलींना व युवतींना शासनाने मोफत उपलब्ध करून दिल्यास, आय एम ए विनामूल्य लसीकरण करण्यास तयार आहे. यावेळी कॅन्सर विषयी पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्याला भरपूर प्रतीसाद मिळाला. 

      शिबीर यशस्वी करण्यासाठी विजया नर्सिंग होम चे संचालक डॉ रामकृष्ण लोंढे, डॉ अभिजित लोंढे, संभाजी कोळी,आनंद रणदिवे, रोटरी चे डॉ सचिन पवार, सचिव डॉ अभिजित जाधवर, अरविंद शिंदे, धर्मेंद्र शहा, शिषीर राजमाने, संजय घुले,  डॉ गिरीश कुलकर्णी,आय एम ए सचिव डॉ सत्यप्रेम वारे, डॉ नितीश गावडे, डॉ पुरूषोत्तम पाटील, डॉ सुधीर आवटे, वैद्यकीय अधिक्षका डॉ मंजुराणी शेळके, ईनरव्हील क्लब च्या अध्यक्षा डॉ वर्षा जाधव, सचिव डॉ मिनाक्षी भवर, प्रोजेक्ट चेअरमन डॉ दिपाली लोंढे, राजश्री देशमुख, निता देवडा, स्वाती राजमाने, बार्शी कॅन्सर हॉस्पिटल चे श्री एम के चौहान सर, श्री हिंगमिरे, सुधीर काटकर, डॉ हांडिबाग मॅडम, कल्पना मठपती, राणी जाधव ई नी परिश्रम घेतले. 

 
Top