तुळजापूर  / प्रतिनिधी-

नवनिर्मिती, प्रेरणा बहुउद्देशीय महिला मंडळ सामाजिक संस्थेच्या  वतीने आयोजित जागर आदिशक्तीचा उत्सव नारी शक्तीचा नवरात्र दांडिया गरबा   स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसांचे वाटप करण्यात आले.

 स्पर्घेत   प्रथम क्रमांक   श्रध्दा चोपदार,   श्रृती काळे,  वैष्णवी भट, सोनाली मुळे, अष्वीणी हिरोळकर या ग्रुपने प्रथम क्रमांक  पटकावला यांना सोन्याची नथ बक्षीस देण्यात आली.  द्वितीय क्रमांक श्वेता कावरे ग्रुपला चांदीचा करंडा, तृतीय क्रमांक एकता व्यास, नयना व्यास, मिताली व्यास खुषि व्यास या ग्रुपला पैठणी साडी, उत्तेजन पारितोषिक रेणूका साठे यांनी वर्ख साडी यांना  संस्थेचे संस्थापक अध्यक्षा तथा भाजपा महिला प्रदेश कार्यकारिणी सदस्य मिनाताई सोमाजी यांच्या हस्ते   बक्षिसे देण्यात आले.

यावेळी संस्थेच्या सचिव संध्या   संध्या खुरूद,  सुनिता काळे, अपर्णा बर्दापूरकर, लता सोमाजी, ॲड. स्वाती नळेगावकर, ॲड. क्रांती थिटे, वर्षा साळूंके, करूणा कावरे  यांच्या उपस्थितीत बक्षिसाचे वितरण करण्यात आले.  दोन दिवस आयोजित कार्यक्रमात तुळजापूर नगरीतील मोठ्या प्रमाणावर महिला युवतींनी सहभाग घेतला.

 

 
Top