उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कळंब तालुक्यातील मौ. हसेगाव के. येथील पर्याय संस्था सभागृहात पर्याय संस्था आणि महाराष्ट्र लोकविकास मंच यांच्या वतीने कळंब आणि वाशी तालुक्यातील 158 विधवा, परितक्ता, एकल महिलांना साड्यांचे वाटप करून स्नेहभोजनासह भाऊबीज साजरी करण्यात आली, तीन सत्रामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला, पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी एकल महिला संघटक श्रीमती सुनंदा खराटे या होत्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले, यावेळी व्यासपीठावर अनिताताई तोडकर, विध्याताई वाघ या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या, यावेळी एकल महिलांच्या प्रतिनिधी अर्चना यादव, विद्या मोरे, सुनीता गायके, आशा गवारे, सारिका शिंदे, रेणुका खुणे, कमल भगत, रंजना डोईफोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, यावेळी सारिका शिंदे म्हणाल्या की पर्याय परिवार हेच आमचे माहेर आहे आणि आम्हाला आमच्या माहेरात भाऊबीज साजरी करायला दर वर्षी बोलवलं तर जात, पर्याय संस्था, महाराष्ट्र लोकविकास मंच यांनी अनिक फायनान्सियल सर्व्हिसेस प्रा. ली. च्या माध्यमातून आम्हाला आर्थिक पाठबळ देऊन जगण्याचे बळ दिले आहे, यावेळी उपस्थित महिलांचे अनुभव ऐकून उपस्थित सर्व भावुक झाले होते, पहिल्या सत्राचा समारोप एकल महिला संघटक श्रीमती सुनंदा अक्का खराटे यांच्या जोरदार भाषणाने झाला, दुसऱ्या सत्रामध्ये प्रास्ताविक अनिक फायनान्सचे ऑपरेशन हेड विलास गोडगे यांनी केले, तसेच श्रीमती तेजश्री तोडकर यांनी महिलांना विवीध व्यवसाय उभे करण्यासाठी कशी मदत केली जाते या बद्दल माहिती दिली, तर पर्याय चे कार्यवाहक तथा मलोविम चे अध्यक्ष विश्वनाथ अण्णा तोडकर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या विविध कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या समाजसेवक मंडळींची ओळख करून दिली, यावेळी ते म्हणाले की पर्याय ने सात हजार महिलांचे संघटन केले असून त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आणि सन्मानाने जगण्यासाठीचे बळ दिले आहे, आजकालची मुलं ही आपल्या आईवडिलांना सांभाळत नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त करून संताप व्यक्त केला आणि वृद्धाश्रम हा पर्याय नाही असे ठणकावून सांगितले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले एम. एन. कोंढालकर पुणे,  मनीषा घुले, दत्ताभाऊ बारगजे, अनिकचे चेअरमन रमेश भिसे, भूमिपुत्र वाघ, ऍड. प्रविण यादव, ऍड.शकुंतला फाटक, ओम गिरी, विठ्ठल तोडकर, पत्रकार सुभाष घोडके, महादेव महाराज आडसूळ, यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

  तिसऱ्या सत्रामध्ये उपस्थित सर्व एकल महिलांना साड्याचे वाटप करून स्नेह भोजन देण्यात आले, संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्रुबा गायकवाड यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्याय परिवारातील नागेश भालेराव, डॉ. हर्षदा तोडकर, वैष्णवी तोडकर, ऋषिकेश तोडकर, विकास कुदळे, भिकाजी जाधव, बालाजी शेंडगे, वैभव चोंदे, रियाज शेख, अतुल चिलवंत, प्रसाद हिंगमिरे, धनश्री हिंगमिरे, निलेश फुलारे, साक्षी तोडकर, सिद्धार्थ तोडकर, शुभम तोडकर, अनिकेत तोडकर, अशोक शिंदे, विनायक अंकुश, संगीता अंकुश यांनी विशेष परिश्रम घेतले.

 
Top