परंडा /प्रतिनिधी :-  

 परंडा तालुक्यातील चव्हाणवाडी येथे मराठा आरक्षण महामोर्चा या विषयावर दि.२८ रोजी संध्याकाळी ८ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सकल मराठा समन्वय समितीच्या मार्गदर्शनाखाली टिम क्रमांक तीन यांनी चव्हाणवाडी ग्रामस्थांना संबोधित केले.बैठकीस मराठा समाजसह गावकऱ्यांचा उंदड प्रतिसाद होता. 

      बैठकीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी काय कराव लागेल तसेच आरक्षण नसल्यामुळे आपले किती नुकसान झाले आहे? याचा आढावा घेतला तर खुप चिंताजनक वास्तव्य समोर येत आहे. कारण आज शासकीय कार्यालयात मराठा अधिकाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. आणि आपण जर हालचाल केली नाही तर पुढील येणारा काळ खुप कठीण असणार आहे. त्यामुळे काहीही झाले तरी आरक्षण मिळालेच पाहिजे या भुमिकेवर आपण ठाम रहायच आहे या बैठकीत ठरले. आपले मराठे सर्वच पक्षात आहेत आणि ते असलेही पाहिजेत परंतु जेंव्हा मराठा अस्मितेचा विषय येतो त्यावेळेस सर्व मराठा नेत्यांनी आपल्या पक्षाने जोडे बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेच आहे. तर आणि तरच आपल मराठयाच अस्तित्व टिकणार आहे नाहीतर भविष्य अंधारात असणार आहे याची सर्वांना जाणीव असायला हवी. पाठीमागे दिलेले आरक्षण हे टिकाऊ नव्हते.त्यावेळेस आपली फसवणूक झाली परंतु आत्ता आपल्याला सावध भूमिका घेऊन  ५० टक्केच्या आतच ओबीसी मधुनच टिकाऊ आरक्षण हा महत्वाचा मुद्दा लावून धरायचा आहे.  मराठा  समाजाला एकीने लढले तरच काहीतरी मिळेल नाहीतर विस्कटलेली समाजाची घडी समाजाला घातक ठरू शकते म्हणून या निमित्ताने एक व्हा व एकजुटीने दि. ८ नोव्हेंबर २०२२रोजी परंडा येथे होणाऱ्या मोर्चासाठी स्वखर्चाने महिला, मुलीसह हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा आहे असे आवाहन करण्यात आले.

    या बैठकीला गावातील युवक,पुरुष, वयोवृद्ध, लहान मुले आणि असंख्य महिला उपस्थित होत्या.    दि.८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महामोर्चा ला गावातील १००% महिला आणि सकल मराठा समाज उपस्थित राहील असं या वेळी उपस्थितां कडून सांगण्यात आले.

 
Top