तुळजापूर / प्रतिनिधी-

नोकरीसाठी लागणाऱ्या आवश्यक बाबी विषयी मार्गदर्शन पर कार्यशाळा  १३ ते १७ आँक्टोबर या कालावधीत संपन्न झाली. 

  श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात टीपीओ अंतर्गत पुणे येथील रुबीकॉन ट्रेनिंग कंपनीच्यावतीने दि.१३ ते १७ ऑक्टोबर याकाळात  पाच दिवसीय स्कील ट्रेनिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.     हैदराबाद येथील ए.आर भागत रहमान व विजयवाडा येथील चंद्रा वंदना यांनी  या कार्यशाळेत  मार्गदर्शन केले. प्रारंभी  प्राचार्य प्रा.रवी मुद्दकना यांनी मार्गदर्शन   केले.  प्रा. छाया घाडगे यांनी या कार्यशाळेचे प्रास्तावीक केले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या बाबीवर चर्चा करून व्यक्तिमत्व विकास ,संवाद कौशल्य, मुलाखत तंत्र या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. 

या कार्यशाळेबद्दल करण शिंदे ,श्रीपाद डांगे ,वैभव बोंडगे यां विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी आभार वैष्णवी जाधव विद्यार्थिनीने मानले. टीपीओ विभाग प्रमुख प्रा. प्रदीप हंगरगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. संतोष एकदंते प्रा. महादेव नारायणकर, प्रा. दीपक शिंदे, प्रा. प्रिया पवार- सुरवसे ,प्रा.राखी कुरे,प्रा. सचिन हजारे ,प्रा. विशाल धनके ,प्रा. जे.एम. शेख व शिपाई वर्ग यांनी परिश्रम घेतले.


 
Top