तुळजापूर / प्रतिनिधी-

 महसूल, भूमी अभिलेख आणि ग्रामविकास विभाग यांच्याकडून गावठाण जमाबंदी प्रकल्पांतर्गत ड्रोनद्वारे तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील गावठाणांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यात पहिल्या टप्प्यात तालुक्यांतील एक हजार ८३ गावांची निवड करून ती पुर्ण झाली आहे. 

 ड्रोनद्वारे होणाऱ्या या मोजणीमुळे तुळजापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दींचे नकाशे उपलब्ध होणार असून, जमीन मोजणीची प्रक्रिया सोपी होऊन नागरिकांना मालमत्तांच्या मालकी हक्कांचे प्रमाणपत्र मिळू शकणार अशी माहती उप अधिक्षक भुमी अभिलेख अधिकारी नितीन वाडकर यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना दिली. 


 
Top