तुळजापूर / प्रतिनिधी-

 महात्मा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत नियमित कर्ज भरणा या तुळजापूर तालुक्यातील ४ ९९९ शेतक - यांना प्रात्साहनपर लाभ योजनेची रककम  खात्या जमा होण्या सुरवात होणार आहे .

 सन २०१७-१८ २०१८ १ ९ व २०१ ९ -२० या तीन वर्षापैकी दोन वर्ष नियमित कर्ज घेवून परतफेड करणा - या शेतक यांची अल्प मुदती पीक कर्जची परतफेड विचारात घेवून जास्तीत जास्त रु .५०००० / - पर्यतचा प्रोत्साहनपर रककमेचा लाभ शेतक - यांच्या बचत खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे . या योजनेतील तालुक्यातील ९९ गावातील लाभार्थी शेतक - यांची यादी गांव पातळीवर प्रसिध्द करण्यात आली होती . योजनेच्या लाभासाठी वैयक्तीक शेतकरी निकष विचारात घेण्यात आला . एका किंवा अनेक बँकाकडून घेतलेली अल्पमुदत पिक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेवून शेतक - यांची प्रोत्साहनपर लाभाची रककम मिळत आहे . नियमित कर्ज भरणा - या ९ ००३ शेतक - यांचा याचा लाभ मिळणार आहे . तालुक्य पहिल्या यादीत ४ ९९९ शेतक - यांचा समावेश आहे . पैकी दिनांक १ ९ .१०.२०२२ पर्यत ४५१ ९ लाभार्थी शेतक यांची आधार प्रमाणिकरण केलेले आहे . शिल्लक ४८० राहिले आहेत . तरी उर्वरीत लाभार्थी शेतक - यांची तात्काळ आधार प्रामाणिकरण करुन घेण्याचे आवाहन श्री.डी.जी.मोरे , सहाय्यक निबंधक सहकारी संस्था , तुळजापूर यांनी केले आहे .


 
Top