उस्मानाबाद (प्रतिनिधी)-

उस्मानाबाद तालुक्यातील आळणी येथील श्री.भैरवनाथ निसर्ग मंडळ संचालित औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरज ननवरे यांचे "कॉम्पुटेशनल अप्रोचेस इन मॉडीफायिंग दी इनहिबिशन ऑफ  टोल लाईक रिसेप्टर इन अल्झायमर्स डिसीज प्रोग्नोसिस युजींग कॅल्विसिप्स परपुरिया डीरायव्हेड ब्रोमिनेटेड  कंपाऊंड, ए-एर्ग्रोक्रिप्टीन." या विषयावरील दुसरे संशोधन,पेटंट कार्यालयाच्या शासकीय जर्नल मध्ये प्रकाशित झाले.यापूर्वी डॉ. ननवरे यांचे "अ कॉम्पुटेशनल सिस्टीम अँड मेथड फॉर इनहिबिशन ऑफ मोंकिपॉक्स व्हायरस युजींग मशरूम डिलिव्हर्ड कंपाऊंड" या विषयावरील सुद्धा पहिले संशोधन, पेटंट कार्यालयाच्या शासकीय जर्नल मध्ये प्रकाशित झाले होते. 

या संशोधन कामासाठी चौधरी एस.वाय.,पद्मश्री दास ,राजेश ननवरे,सुदर्शन बोराह,पल्लभ के. विवेक राठोड,संदीप क्षीरसागर,सोनाली वाघमारे, राहुल बुचडे,यांचे योगदान लाभले. सदरील पेटंट प्रकाशित झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश पाटील,डॉ.प्रतापसिंह पाटील तसेच डॉ. वेदप्रकाश एजुकेशनल कॅम्पस मधील सर्व विभागांचे प्राचार्य,विभागप्रमुख,प्राध्यापक व सर्व कर्मचाऱ्यांनी डॉ.सुरज ननवरे यांचे अभिनंदन केले तसेच त्यांच्या संशोधनाच्या पुढील कामासाठी शुभेच्या दिल्या.

 
Top