उस्मानाबाद - प्रतिनिधी

नवरात्र निमित्त आई तुळजाभवानी देवीच्या भक्तांना मोफत फराळाचे वाटप स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ बापूजी साळुंके विधी महाविद्यालयच्या वतीने बावी येथे करण्यात आले. अनेक भाविक तुळजापूरला नवरात्रात तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी पायी चालत जातात यावेळी त्यांच्या फराळाची व पाण्याची व्यवस्था महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी यांच्या वतीने करण्यात आली. विधी महाविद्यालयाच्या वतीने विविध सामाजिक व कायदेशीर जनजागृतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते त्याचाच हा एक भाग होता.

या कार्यक्रम विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही जी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा डॉ स्मिता कोल्हे, प्रा नितीन कुंभार यांनी आयोजन केले होते. त्याला प्रा डॉ संजय आंबेकर, प्रा इकबाल शेख, चांदणी घोगरे, सोनाली पाटील, दिपाली बारकूल, श्रेयश मैंदरकर, पूनम तापडिया यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमात विधी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभाग नोंदविला.


 
Top