उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 २०२० चा पीक विमा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बजाज अलायन्स कंपनीने तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी आ. कैलास पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.मात्र अद्याप कोणता तोडगा निघालेला नाही. कैलास पाटील यांच्या उपोषणाला दक्षता फाऊंडेशन व बेंबळी (ता.जि.धाराशिव) येथील समस्त शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला.

शिवसेनेचे आमदार कैलाैस पाटील यांच्या उपोषणाचा आज शनिवार दि. २९ रोजी सहावा दिवस उजाडलेला आहे. परंतु अद्यापही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उपोषण सुरूच आहे. दरम्यान अामदार कैलास पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देत ह्या लढ्यात दक्षता फाऊंडेशन व समस्त बेंबळी येथील शेतकरी आपल्या सोबत असल्याचे अामदार कैलास दादांना आश्वासन देऊन विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.  यावेळी त्याच्यासोबत माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांची उपस्थिती होती. 

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनावर दक्षता फाऊंडेशन अध्यक्ष गालीब पठाण, उपाध्यक्ष नितीन पाटील, सदस्य रणजित बरडे, अतिक सय्यद, बालाजी माने, नंदकुमार मानाळे, मारूती सोनटक्के, गोविंद पाटील, सुनिल वेदपाठक, बेंबळी येथील प्रगतशील शेतकरी नाना कामतकर, दत्ता वाघमारे  व अन्य शेतकरी व दक्षता फाऊंडेशनचे सर्व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

 
Top