उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  गवळी गल्लीत शतकानू शतकापासून  समाजाच्या वतीने ,पारंपारिक चालत आलेल्या , रितीरिवाजानुसार  सगर पूजा व म्हशी पळाविण्याचा कार्यक्रम  अत्यंत आनंदाने व उत्साहाने संपन्न झाला. 

या उत्सवातून राष्ट्रीय एकात्मता टिकविण्याचा व जातीभेद धर्म विसरण्याचा व आम्ही सर्व एक आहोत हा संदेश या कार्यक्रमातून शतकांशतकापासून दिला जात आहे.  दोन वर्ष कोरोनाचा काळ होता व शासनाचे निर्बंध. यावर्षी पशुपालकांनी अत्यंत उत्साहाने व पशुना अत्यंत सजवून व फटाक्याच्या व बँड यासारख्या वाद्याने आणले जात होते. पशुपालकांच्या चेहऱ्यावर यावर्षी एक वेगळा आगळा आनंद दिसून येत होता पाऊस  पाणी चारा चांगला झाला.

 पशुंची संख्या कमी झाली जाणवत होती. परंतु दुग्ध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींच्या व पशुच्या पालनातील आनंद या ठिकाणी दिसून येत होते. म्हशी व  रेडे अत्यंत रंगरंगोटी विविध आकर्षक झूला व नक्षी,शिंगावर व गळ्यात मोरकुजा,फुलांचे हाराने  सजवून  पूजा विधीसाठी व पळविण्यासाठी आणली जात होती .पशुपालकांनी मोटार सायकलच्या आवाजावर, काळी घोंगडी व लाल गमजाच्या इशाऱ्यावर व हलगीच्या तालावर व दणदणीत आवाजावर पळविण्याचा प्रयत्न केला.  ग्रामीण भागातील, शहरी भागातील व तुळजापूर येथील म्हशी पळविण्यामध्ये आनंद देण्यात परिपूर्ण झाला. यावेळी गवळी समाजातील मानकरी ,कारभारी व पंच काशिनाथ दिवटे व भीमाशंकर दहीहंडे यांनी सर्व पशुपालकांचा टिळा - पान सुपारी देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये कुराडे, सुरवसे  रायबाण, सिद्दिकी, कुरेशी, शेख, बनसोडे,सरवदे, गुंडरे,केदार उपाध्ये, कदम  अमोल पवार,शेरकर, म्हैस इशाऱ्यावर पळवतात कशा तुळजापूर येथील मलकूनाईक यांनी दाखवून दिले . समाजातील पशुपालकांच्या सर्व चहात्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. यामध्ये श्रीकांत व  दुर्गेश दिवटे ,हुच्चेबंधू, खेलगवळी व दहीहंडे बंधू ,अंजीखाने , मिसाळ, आप्पा पंगुडवाले, सुरवसे, उपाध्ये इ. परिश्रम घेतले. पाडव्या दिवशी गवळी समाजातील महिला व पुरुष आपल्या लहान थोर परिवारासहित नैवेद्य व दिवे घेऊन सगर पूजा केली जाते.  समाजातील सर्व बंधू भावांना टिळा लावून व पानसुपारी देवून  महिला एकमेकीला हळदी- कूंकू लावून कौटुंबिक नाते घट्ट होवून भारतीय संस्कार परंपरागत जपतात. ज्यांच्या घरात म्हैस किंवा गाय यांना लक्ष्मीस नैवेद्य खाण्यास देतात सलाम करण्यास लावली जाते.पूजा करून गणपतीची आरती व देवीची आरती म्हणून सगर पूजा संपन्न होते. यावेळी बँडवाद्यासह काळा मारुती पर्यंत मिरवणुकीने जाऊन येथे पूजा व श्रीफळ वाढवून संपन्न होते  मिरवणुकीचे विसर्जन येथे केले जाते.या संपूर्ण कार्यक्रम पहाण्यास दुतर्फा प्रेक्षकांनी गर्दी केली होती म्हशी कलापूर्ण पळविण्याचा आनंद लुटला.या कार्यक्रमास मार्गदर्शन समाजातील ज्येष्ठ गजानन  गवळी यांचे मिळते.भालचंद्र हुुच्चे यानी सहकार्य व प्रोत्साहन मिळावे असे आवाहन व आभार मानले.

 
Top