उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 डॉ बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 16 ते 19  ऑक्टोबर दरम्यान पार पडलेल्या”डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद युवा महोत्सव 2022” मध्ये यशस्वी सहभाग नोंदवला. प्राचार्य डॉ व्ही जी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा अजित शिंदे व प्रा चंदनी घोगरे यांच्या समवेत विविध कलाप्रकार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यास प्रा इक्बाल शाह व कार्यालयीन कर्मचारी संभाजी बागल, रोहित क्षिरसागर यांचे सहकार्य लाभले.

 ओंकार शितोळे याने वक्तृत्व स्पर्धेत, पृथ्वीराज खोचरे याने व्यंग चित्रकला, शिवराज माने याने चित्रकला, अफरोज पठाण याने स्पॉट फोटोग्राफी, स्वराज कदम-ला याने फोटो कोलाज, निखिल शेंडगे याने पोस्टर पेंटिंग,

श्रीकांत निंबर्गे याने मृदमुर्तिकला, वैभव बैरागी याने रांगोळी व द्वारका देवळे हिने काव्य वाचन स्पर्धेत सहभाग घेतला.


 
Top