उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक नुकतीच पार पडली, या बैठकीत  डॉ.ओम्बासे  यांनी दिवाळी सणाच्या अनुषंगे खवा या अन्न पदार्थाची मागणी वाढते त्यामुळे त्यात भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांनी दिवाळी सणानिमित्त अन्न पदार्थाची खरेदी हि नोंदणीकृत आस्थापनामधून करावी. खरेदी केलेल्या अन्न पदार्थाचे पक्के बिल घ्यावे. अन्न पदार्थाच्या दर्जाबाबत काही शंका/तक्रार असल्यास टोल फ्री क्र.  1800 222 365 या क्रमांकावर संपर्क करण्याबाबतचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त श्री.शि.बा.कोडगिरे यांनी केले आहे.

 म्हणून खवा या अन्न पदार्थाचे जास्तीत जास्त नमुने घेवून जप्तीची कार्यवाहीचे घेण्याबाबत  शासनाचे आदेश असल्याने अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील न.त.मुजावर यांच्या पथकाने दि.17 ऑक्टोबर 2022  रोजी मे.अमोल खवा भट्टी, मु.पो.पारा,ता.वाशी या पेढीस भेट देवून विना परवाना व अस्वच्छ ठिकाणी खवा उत्पादन केल्यामुळे खव्याचे 2 नमुने घेवून उर्वरित साठा 260 किलो खवा किंमत रु.54 हजार 600/- जप्त करण्यात आला. तसेच दि.19 ऑक्टोबर 2022 रोजी मे.सायली खवा सेंटर, मु.पो.उमाचीवाडी, ता.भूम येथेही भेट देवून विना परवाना  व अस्वच्छ ठिकाणी खवा उत्पादन केल्यामुळे खव्याचे 2 व पेढ्याचा 1 नमुना घेवून खव्याचा उर्वरित साठा 498 किलो किंमत रु.104580/- जप्त करण्यात आला आहे.  उपरोक्त नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यांनतर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातर्गत पुढील कार्यवाही घेण्यात येईल. सदरची कार्यवाही शि.बा.कोडगिरे, सहायक आयुक्त(अन्न), श्रीमती मुजावर अन्न सुरक्षा अधिकारी, तु.उ.अकोसकर नमुना सहायक उ.शं.वंजारी, सहआयुक्त(औरंगाबादविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे.


 
Top