उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सन 2020 च्या पिक विम्याची 531 कोटी रुपये जिल्ह्याची तीन लाख 57 हजार पात्र शेतकऱ्यांना बँक खात्यात तीन आठवड्यात जमा करने बंधनकारक असतानाही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नाहीत. सर्वोच्च न्यायालयानंतर कोणाकडे न्याय मांगावा, अशी हतबलता दाखवत शेतकऱ्यांना विमा रक्कमेपासून वंचित ठेवले जात आहे, त्यासाठीच अमरण उपोषणास बसावे लागले आहे, असे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, अा. कैलास पाटील यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले. यावेळी उपोषणस्थळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भेट दिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने अमरण उपोषण मागे घेण्यासंदर्भात चर्चा केली. परंतू आमदार पाटील यांनी ठोस निर्णय घेतल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे सांगितले. 


 अतिवृष्टी,सततचा पाऊस व पीक विमा याचे पैसे सरकार आणि विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील हे सोमवार 24 ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर   आमरण उपोषणास बसले आहेत.   दिवाळीपूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली होती, ती मान्य न झाल्याने   आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. अामदार पाटील यांनी ३१ मे २०२२ रोजी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, तीन आठवड्याच्या आत विमा रक्कम देण्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही एक रुपया ही शेतकऱ्यांना दिला गेला नाही. गोगल गाय, खोड माशी, यलो मोजाक या पिकांवर पडलेल्या रोगामुळे शेतकरी अडचणीत आला होता, याच दरम्यान अतिवृष्टी झाल्याने थोडे फार हाती आलेले पीक ही वाया गेले. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी पाटील यांनी केली. यावेळी विविध संघटना व अनेक गावांतील ग्रामपंचायतीने आपला पाठींबा दर्शविला. 

आम आदमी पार्टीचा पाठींबा 

आम आदमी पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अॅड. अजित खोत यांनी अामदार पाटील बसलेल्या उपोषणस्थळी भेट देऊन त्यांनी आपल्या पार्टीचा पाठींबा जाहीर केला.शेतकरी अडचणीत असताना राज्य सरकार कोणताही निर्णय घेत नाही, पंचनाम्यात वेळ घालवत आहे, असे सांगून शेतकऱ्यांना पीक विमा न मिळण्यास कोण कारणीभुत आहे, याची पोलखोल पाच नोव्हंेंबर रोजी आपण करणार असल्याचे सांगितले. 

१२०० कोटी मिळने अपेक्षीत-मकरंदराजे 

२०२० व २१ चा पीक विमा अतिवृष्टी या सगळ्याचे मिळून सरकार व पीक विमा कंपनीकडून  1200 कोटी रुपये मिळणार असून ती रक्कम थकीत आहे. शेतकऱ्यांना आज उत्पन्नाचे कांही ही साधन राहिले नाही, त्यामुळे हे १२०० कोटी रुपये शेतकऱ्यांना त्वरीत मिळावे व ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे., असे सांगितले. 


 
Top