उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र राज्याच्या पुणे येथील आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या  आदेशानुसार  2022-23 या वर्षात विविध खेळाच्या शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन करण्यास मान्यता प्रदान केली आहे.

 त्यानुसार 2022-23 या वर्षात जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने  विविध शालेय खेळाच्या क्रीडा स्पर्धा आयोजन तसेच नियोजन करणे आवश्यक आहे.

 त्याअनुषंगाने जिल्हातील शाळा, महाविद्यालयातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी होण्या-या शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंविण्याकरिता जिल्हयातील सर्व क्रीडा शिक्षकांना दि. 12 ऑक्टोबर, 2022 रोजी (सकाळी 10 ते सायंकाळी 5.00 वाजता) जिल्हा परिषद उच्च माध्यमिक कन्या प्रशाला, उस्मानाबाद येथील सभागृहात ऑन लाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

  तरी जिल्हयातील जास्तीत जास्त क्रीडा शिक्षकांनी या प्रशिक्षण शिबीरास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी कैलास लटके 8329571660 यांच्याशी संपर्क साधवा.


 
Top