उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत उस्मानाबाद तालुक्‍यातील तेर येथील ग्रा.पकल्प अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

 या भरती प्रक्रियेत तेर येथील अंगणवाडी मध्ये सेविकेचे एक पद तसेच बुकनवाडी, भिकार सारोळा, पवारवाडी, रुई ढोकी आणि येडशी अंगणवाडी मध्ये मदतनीसचे प्रत्येकी एक पद, कोंड अंगणवाडी मध्ये मदतनीसचे दोन पदे, बावी (ढोकी) अंगणवाडी मध्ये मिनी अंगणवाडी सेविकेचे एक पद याप्रमाणे आवेदन पत्र स्वीकारली जाणार आहेत.

 या पदांसाठीचे आवेदनपत्र हे प्रकल्प कार्यालयाने विहीत नमुन्यातील प्रमाणित केलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्र आणि प्रमाणपत्रासह परिपूर्ण भरलेला अर्ज येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी, तेर (ग्रामीण) पहिला मजला, जुनी ग्रामपंचायत इमारत, तेर, ता.जि.उस्मानाबाद यांच्या कार्यालयात दि.06 ते 19 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज प्रकल्प कार्यालयात कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) स्वीकारले जाणार आहेत.


 
Top