उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  कळंब तालुक्यातील संत गोरोबा सहकारी सूतगिरणी म. या सूतगिरणीची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमनुसार दि.28 फेब्रुवारी 1991 रोजी नोंदणी झाली आहे. तीचा नोंदणी क्रमांक ओ.एस.एम./पीआरजी / (अ)/ डीएच 05 असा आहे.

 या सूतगिरणीवर प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आले होते. या प्रशासक मंडळाचा कालावधी संपला आहे. तसेच सूतगिरणीच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यासंबंधाने प्रशासकीय मंडळाकडुन कोणतीही कार्यवाही झाली नाही. सूतगिरणीच्या संचालक मंडळ आणि हंगामी सदस्य समिती यांनी सूतगिरणी उत्पादनाखाली आणण्यासाठी कोणत्याही ठोस कार्यक्रमाची आखणी केली नाही. तसेच या सूतगिरणीचे उत्पादन सुरू होण्याची शक्यता दिसून येत नसल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमानुसार कार्यवाही करणे क्रमप्राप्त झाले आहे. या सूतगिरणीच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की, महाराष्ट्र सहकारी अधिनियम तरतुदीनुसार सूतगिरणी नोंदणी रद्द करण्या संदर्भात काही हरकती असल्यास, वस्त्रोद्योग आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, जुने सचिवालय इमारत, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे दि. 22 सप्टेंबर 2022 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.

 तथापि, सूतगिरणीद्वारे केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने ही सुनावणी दि. 02 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 01.00 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सुनावणीस उपस्थित राहून हरकती मांडाव्यात. या दिवशी आपण उपस्थित न राहिल्यास किंवा आपल्या हरकती प्राप्त न झाल्यास या दिनांकानंतर कोणत्याही हरकतींची दखल घेतली जाणार नाही आणि आपले काही म्हणणे नाही असे गृहीत धरुन सूतगिरणींची नोंदणी रद्द करण्याबाबत महाराष्ट्र सहकारी अधिनियम अन्वये अभिहस्तांकितीची नेमणूक करणे आणि महाराष्ट्र सहकारी अधिनियम अन्वये पुढील कायदेशीर, वैधानिक कार्यवाही करण्यात येईल. याची नोंद घ्यावी, असे आवाहन वस्त्रोद्योग तथा अतिरिक्त निबंधक सहकारी संस्थेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे.


 
Top