उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील जिल्हा  ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे  जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन ल,झाडे  यांच्या हस्ते मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन करून उपस्थित कर्मचा-यांसह जयंती साजरी करण्यात आली . तसेच स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या आठवणी जतन करण्याच्या उद्देशाने वाचन प्रेरणा दिन  साजरा करण्यात आला. 

याप्रसंगी ग्रंथप्रदर्शन आयोजित करुन अधिकारी व कर्मचारी यांनी विविध विषयांवर माहितीचे वाचन केले. 

यावेळी  उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण ) बी ,एच, निपाणीकर,जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी ,बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव, जीवन राठोड,अतुल जगताप निरीक्षक समाजकल्याण (जि, प,)बप्पासो नाईकनवरे अधीक्षक,मुलांचे शासकिय वसतिगृह प्र गो राठोड, तांत्रिक सहायक एस एन भोरे आदीसह वाचक वर्ग उपस्थित होते...सोबतच वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला,याप्रसंगी श्री अर्जुन झाडे यांनी वाचकांना वाचनाचे महत्व पटवून सांगितले ,अनिल सुर्यवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले,

 
Top