तुळजापूर / प्रतिनिधी-

 छञपती शिवाजी महाराज पुतळ्या समोरील काँर्नरला  नळदुर्ग भाजपा कार्यकर्ते  व पोलिसांनमध्ये गाड्या  सोडण्याच्या कारणावरुन शाब्दीक चकमक उडुन काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  सदरील घटना शनिवार दि.१ रोजी दुपारी दोन वाजता घडली होती . तणावाची परिस्थिती बघताच तिथे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला.याबाबत भाजपा कार्यकत्यांनी आ.राणा पाटील यांच्याशी संपर्क साधुन  चर्चा केल्याचे वृत्त आहे.

  गाड्या आत सोडण्यासाठी आग्रह केल्याने परिस्थिती उद्भवली -पो.नि काशीद 

आम्ही त्यांना वाहनतळ फुल्ल झाले आहे इतक्या गाड्या बसत नाही सांगितले  तरी तशीच गाडी नेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पिटाळुन लावले एक तर विरोधीपक्षनेते अजित दादा पवार, माजी आ. क्षिरसागर हे येणार असल्याने यांचा बंदोबस्तात तणावात होतो त्यांनी आम्हाला पोलिस अधीक्षिक यांना भेटायाचे आहे  म्हणून सांगितले असते तर सोडले असते, असे यावेळी म्हणाले .वाहने आत सोडण्यावरून सातत्याने शाब्दीक  कुरबु-या होत आहे. असे या प्रकरणी बोलताना पो. नि आजिनाथ काशीद सांगितले .


 
Top