उस्मानाबाद / प्रतिनिधी-

   आनंदनर पोलीस ठाण्याचे पथक अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासाठी   शहरात गस्तीस होते. 

दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली की, उस्मानाबाद शहरातील तुळजाभवानी शॉपिंग सेंटरमधील गाळा क्र. 114 मध्ये ‘श्री साई व्हिडीओ गेम सेंटर व करमणुक टाईमपास’ येथे जुगार खेळला जात आहे. यावर पथकाने नमूद ठिकाणी 13.30 वा. सु. छापा टाकला असता तेथे  बाबासाहेब साहेबराव कदम, सुजीत दयानंद भोसले,मनोज बबन जाधव, महेश अरुण तावडे,  हे सर्व लोक आढळले. तसेच नमूद गाळ्यात ठिकठिकाणी व्हिडीओ गेमचे मशीन चालू स्थितीत असून तेथे नमूद चौघे पेश्यावर गेम खेळत व खेळवीत असल्याचे समजले. पथकाने त्या चौघांकडे अधिक तपास केला असता ते व्हिडीओ  गेम हे रफीक शेखलाल नदाफ, रा. उस्मानाबाद यांचे असल्याचे समजले. पथकाने नमूद व्हिडीओ गेम सेंटरच्या परवाण्याबाबत विचारपूस करुन परवाना पाहिला असता त्याची वैधता सन- 2015 सालीच संपुष्ठात येउन पुन:नुतणीकरन झाले नसलयाचे दिसले. यावरुन सदर व्हिडीओ   गेम सेंटर हे अवैधरित्या चालू असल्याने व्हिडीओ   गेमच्या 12 मशीनसह 02 मोटारसायकल, 3 मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण 1,51,162 ₹ चा माल पथकाने जप्त करुन नमूद 5 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 4, 5 अंतर्गत आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

   सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक .अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन उस्मानाबाद उप विभागाचे पोलीस उप अधीक्षक  कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदनगर पो.ठा. चे पोनि- तानाजी दराडे, पोलीस अंमलदार- बांगर, बोचरे, कुंभार, लोमटे, खंडेराव, शेळके यांच्या पथकाने केली आहे

 
Top