तुळजापूर / प्रतिनिधी-

  उस्मानाबाद जिल्हयाचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची नवराञोत्सवात अचानक बदली होवुन त्यांच्या जागेवर  नवीन जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे आल्याने तसेच पोलिस अधीक्षिक अतुल कुलकर्णी यांचा ही नवराञोत्सव पहिलाच आहे  तसेच तुळजापूरचे मुख्याधिकारी अरविंद नातू हे ही नवराञोत्सवाच्या तोंडावर रुजू झाले आहेत.  त्यामुळे आता नवराञोत्सवाची धुरा या  नव्या दमदार अधिकाऱ्यांच्या खांद्यावर  हाती आल्याने हे निर्बंध मुक्त नवराञोत्सव निर्विघ्न व शांततेत पार पाडण्याचे आव्हान यांच्या समोर असणार आहे. 

  मराठवाडात पीएफआय ची व्याप्ती राजकिय तणाव भाविकांची प्रचंड वाढत जाणारी गर्दी हे आव्हाने या अधिकारी वर्गासमोर प्रामुख्याने असणारे आहेत.

नुतन जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्या कारभार कामकाजाची सुरुवात   तर  महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानीच्या नगरीतुन होणार आहे. नवराञोत्सवात येणारा २० ते २५ लाख भाविक व जिल्हयातील एक हजाराच्या  आसपास असणारे गावे यांचा कारभार या अधिकाऱ्यांना हाकावा लागणार आहे.  वेळ कमी काम अधिक अशी संकटाची परिस्थिती आहे.


 
Top