उस्मानाबाद  /  प्रतिनिधी - 

 लेडीज क्लब आयोजित नवरात्र दांडिया महोत्सव - २०२२ मध्ये दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध अभिनेत्री समृद्धी केळकर आणि रूपाली भोसले यांनी महोत्सवाला रंगत आणली. यावेळी गौरी सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर करून अामदार राणाजगजितसिंह पाटील व लेडीज क्लबची अध्यक्षा अर्चना पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते बक्षीसाचे वितरण करण्यात आले. 

लेडीज क्लबच्या वतीने नुकत्याच गौरी सजावटीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्याचा निकाल जाहीर करत बक्षीस वितरण करण्यात आले. श्रीमती इंदुमती पवार यांनी प्रथम क्रमांक मिळवत १०,००० रुपयांचे बक्षीस जिंकले, श्रीमती कल्पना लोकरे यांनी द्वितीय क्रमांकाचे ७,००० रुपयांचे तर श्री.काकासाहेब पेठे यांनी तृतीय क्रमांकाचे ५,००० रुपयांचे बक्षीस मिळविले. या व्यतिरिक्त ४ उत्तेजनार्थ व २९ सहभागी स्पर्धकांना विशेष उत्तेजनार्थ म्हणून पारितोषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

तरुणाईचा मोठा प्रतिसाद लाभत असल्याने हा उत्सव जल्लोषात साजरा होत आहे.


 
Top