उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आयोजित केंद्रीय युवक महोत्सव 2022. या उपक्रमात एकूण 36 कलाप्रकार होते. विद्यापीठातील सर्वच महाविद्यालयांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता. या युवक महोत्सवात रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबाद येथून सहा संघ सहभागी होते. लोकगीत , समूहगीत, भजन, काव्यवाचन ,रांगोळी व वक्तृत्व यापैकी डॉ .बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वक्तृत्व स्पर्धेत विद्यापीठांतर्गत एकूण 150 विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेसाठी सहभागी झाले होते. यामधून रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचा एम. कॉम. भाग. 1 मध्ये शिकत असलेला कु.प्रतीक गायकवाड  या विद्यार्थ्यास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. त्याच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या सांस्कृतीक वैभवात भर पडली असून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढला आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. 

या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी अभिनंदन केले. तसेच या  युवक महोत्सवात सहभागी होण्यासाठी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी प्रोत्साहन देऊन सहकार्य केले. या यशासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिवाजीराव गायकवाड (मराठी विभाग प्रमुख) यांनी परिश्रम घेऊन मोलाचे मार्गदर्शन केले .

 
Top