उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्हयात खालील प्रमाणे सण/उत्सव व कार्यक्रम व विविध पक्ष संघटना यांचे वतीने त्यांचे मागणी संदर्भात धरणे,मोर्चे,बंद,संप,रस्तारोको इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम आयोजित आहेत. 

मराठा आरक्षण,ओबीसी राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी विविध पक्ष/संघटना यांचे कडुन आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पिकविमा व नुकसान भरपाईची देय रक्कम मिळणे आणि इतर मागण्या अनुषंगाने शेतकरी तसेच विविध पक्ष/संघटना यांचे कडुन धरणे,मोर्चे,उपोषण,आत्मदहन,बंद, निदर्शने,तालाठोको व रास्तारोको इत्यादी प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उस्मानाबाद जिल्हयात ग्रामीण/शहरी भागात विविध ठिकाणी यात्रा/जत्रा/ऊरूस लहान मोठया स्वरुपात साजरे करण्यात येतात. कार्तिकीवारी पंढरपूर निमित्त विविध संतांच्या पालख्या,पायी दिंडया उस्मानाबाद जिल्हयातुन श्रीक्षेत्र पंढरपूर कडे मार्गस्थ होतात. व्यक्ती,व्यक्ती समुह तसेच विविध पक्ष/संघटना यांचे वतीने त्यांच्या विविध मागण्यासाठी अचानकपणे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी वरील प्रमाणे संपन्न होणारे धार्मिक सण/उत्सव व आंदोलनात्मक कार्यक्रम उस्मानाबाद जिल्हयात शांततेत पार पाडण्याकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिनांक 29 ऑक्टोबर 2022 रोजीचे 00.01 पासुन ते दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी 24.00 वाजे पावेतो (दोन्ही दिवस धरुन) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 31 (1) (3) प्रमाणे जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश संपुर्ण उस्मानाबाद जिल्हयात जारी  करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केली आहे.


 
Top