उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मल्टिमीडिया प्रदर्शनच्या माध्यमातून शासकीय योजंनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यानी केले. 8 वर्ष सेवा सुशासन गरीब कल्याण व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या संकल्पनेवर आणि कोजागरी पौर्णिमा निमित्त माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो सोलापूर ब जिल्हा प्रशासन उस्मानाबाद यांच्या सयुंक्त विद्यमाने जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी टोल प्लाझा येथे आयोजित केलेल्या तीन दिवसीय डिजिटल मल्टिमिडीया प्रदर्शनचे उदघाटन प्रसंगी बोलत होते.

        प्रदर्शनचे उदघाटन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलिस उप अधीक्षक डॉ सई भोरे-पाटील, तहसिलदार सौदागर तांदळे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, स्थानिक गुन्हे विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प प्रमुख विनोद जजेरिया, तामलवाड़ी टोल प्लाज़ाचे व्यवस्थापक प्रसेनजीत वाघमारे, उद्योजक गणेश छ्लानी, सहायक पोलिस निरीक्षक सचिन पंडित, सेवानिवृत्त अधिकारी सतीश घोड़के आणि क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव आदि मान्यवर उपस्थित होते.

       पोलिस अधीक्षक कुलकर्णी यानी यावेळी कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाना राज्यातून येणा-या भविकांसाठी विभागाकडून करण्यात आलेल्या वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थेविषयी कन्नड भाषेतून माहिती दिली. तसेच अधीक्षक कार्यालयाकडून तयार करण्यात आलेली मदत केंद्रे आणि वाहतूकीच्या सोयी सुविधा विषयाच्या वीडियो संबधि देखील माहिती देण्यात आली. 

  कार्यक्रमाचे प्रास्ताविकेतुन अंकुश चव्हाण म्हणाले की  केंद्र सरकारकडून 8 वर्षात राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजना, उपक्रम, स्वातंत्र्यातील योध्दे, समाजसुधारक, राष्ट्रपुरुष व स्वातंत्र्य सैनिकांची माहिती, स्वातंत्र्यसंग्रामाशी संबंधित ऐतिहासिक घटना, स्थळविषयी माहिती आणि राष्ट्रपिता गांधीजी यांचे 1869 ते 1948 पर्यन्तच्या जीवन प्रवासाची माहिती या डिजिटल मल्टिमिडीया स्क्रीनमधून  दाखविली जाणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अंबादास यादव यानी केले. हे प्रदर्शन दिनांक 7 ते 9 ऑक्टोबर 2022 पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे. प्रदर्शनातील चित्रे व मजकूर डिजिटल एल ई डी स्क्रीनमध्ये असल्याने रात्रीच्या वेळी पाहण्याचे विशेष आकर्षण असणार आहे. 

            प्रदर्शनच्या आयोजनसाठी केंद्रीय संचार ब्यूरोचे कार्यालय सहायक जे एम हन्नुरे, योगी कोंडाबत्ती, साईराज, सचिन जाधव, तामलवाड़ी पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई व टोल प्लाजाचे कर्मचा-यानी सहकार्य केले.

 
Top