उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  श्री तुळजाभवानी मातेच्या अश्विनी पोर्णिमेसाठी येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी  पुर्वी अठरा प्रथमोपचार केंद्र होते त्यात चारची वाढ करुन आता एकुण बावीस प्रथमोपचार केंद्र अश्वानी पोर्णिमेसाठी कार्यन्वीतकरण्यात आल्याची माहीती, उपजिल्हारुग्णालय तुळजापूरचे वैद्यकीय अधिकारी डाँ एच व्ही होनमाने यांनी दिली .

  याञाचा धुरा प्रभारी अधिकाऱ्याचा हाती !

 धाराशिव जिल्हयाचे पालकमंञी तानाजी सावंत हे आरोग्य मंञी असुन श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सवातील भाविकांच्या आरोग्याची सेवेची धुरा    प्रभारी अधिकाऱ्यावर वर सोपवणे योग्य आहे का असा सवाल होत असुन  तिर्थक्षेञी असणाऱ्या उपजिल्हारुग्णालयसाठी स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी नेमावा अशी मागणी होत आहे. 

 यंदा भाविकांची संख्या वाढल्याने २५ सप्टेबर ते ६आँक्टोबर या  अकरा दिवसाचा काळात ३९५६० रुग्णावर उपचार केले आहेत.यात बीपी शुगरच्या ३५२५ रुग्णांचा समावेश आहे. श्रीतुळजाभवानी मंदीरसह शहर परिसरात सर्वञ प्रथमोपचार केंद्र आहेत.  या प्रथमोपचार केंद्रावर तीन शिफ्ट मध्ये डाँक्टर, सिस्टर,  शिपाई काम करतात एकुण २७६ आरोग्य कर्मचारी देविदशनार्थ पायी चालत येणाऱ्या  भाविकांना आरोग्य सुविधा पुरवणार  आहेत.

 

 
Top