तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तुळजाभवानी मंदिर परिसरातील आणि शहरातील भिक मागणाऱ्या शिक्षण बाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी साडेचार वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार बोंदर यांच्या कडून निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी उस्मानाबाद, पोलीस अधिक्षक, महिला व बालविकास अधिकारी, शिक्षण विभाग यांना सतत पाठपुरावा करण्यात येत होता. सतत च्या तक्रारीमुळे प्रशासनाकडून जुजबी कारवाई करून उपाययोजना करत असल्याचे भासवले.

जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्या समोर तक्रारी अर्ज आल्यानंतर सर्व विभागाला बैठकीसाठी बोलावण्याबाबत महिला व बालविकास अधिकारी सुनील अंकुश यांना सूचना केल्या. सदरील बैठक दिनांक 1 नोव्हेंबर मंगळवारी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, प्रलंबित असलेल्या बाल भिक्षेकरी प्रश्नावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेणार यांच्याकडे लक्ष आहे.


 
Top