उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी बारामती येथील गोविंद बागेत पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सदिच्छा भेट घेतली.

  या भेटीदरम्यान खा.शरद पवार यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेतले.तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती देत शेतकऱ्यांना मदत मिळावी याकरिता वरिष्ठ पातळीवर शरद पवार यांनी प्रयत्न करावेत अशी विनंती देखील त्यांना डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी केली.


 
Top