तेर  / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील संतश्रेष्ठ गोरोबा काकां यांच्या पालखीचे पंढरपूरला कार्तिक सोहळ्यासाठी  प्रस्थान आ.राणाजगजितसिंह पाटील, सह धर्मादाय आयुक्त एस.पी.पाईकराव, निरीक्षक एस.पी.बनसोडे  यांच्या हस्ते झाले.

पालखी मंदिरातून मुख्य रस्त्यावरून हिंगळजवाडी येथे मुक्कामासाठी रवाना झाली.यावेळी भाविकभक्तानी दर्शनासाठी दुतर्फा गर्दी केली होती.यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील,मल्हारभैय्या पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, पूरूषोतम पुजारी, पद्माकर फंड,सरपंच नवनाथ नाईकवाडी, दत्तात्रय मुळे, माजी सरपंच महादेव खटावकर,विठ्ठल लामतुरे, धनंजय पुजारी, नवनाथ पांचाळ, साहेबराव सौदागर, रघुनंदन महाराज पुजारी, प्रशांत वाघ,भिमा माने,संजय जाधव, नानासाहेब भक्ते, नामदेव थोडसरे,सतिष थोडसरे ,काकासाहेब मंगर, विवेकानंद नाईकवाडी, अभिमान रसाळ,हरी भक्ते व मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.


 
Top