उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 अंनत श्री विभूषीत जगद़गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज  दक्षिण पीठ नानिजधाम यांचे सिघ्द पादुका पुजन व दर्शन प्रवचन  सोहळया चे आयोजन मंगळवार दि, १८ ऑक्टोबर  रोजी  सकाळी १० वाजता तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना कारखाना ढोकी चौका जवळ  च्या प्रांगणात  आयोजन  करन्यात आले आहे ,याच दिवशी सकाळी गुरु पूजन  चा ही कार्यक्रम होणार आहे .

 या   संस्थानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यात गरीब व गरजू व्यक्तींना परमपूज्य जगतगुरू नरेंद्राचार्यजी महाराज नानीज धाम या संस्थानच्या वातिने  गरीब महीलांना शिलाई मशीन ,जनावरांना चारा, शौशिण साधने चे मोफत वाटप केले जाते. या कार्यक्रमाला पन्नास हजारावर भक्तगण उपस्थित राहणार असल्याची माहिती  जिल्हा निरीक्षक संजय खंडागळे  यांनी  दिली आहे .

याच बरोबर मार्गदर्शन व प्रवचन  दर्शन सोहळयासाठी येणाऱ्या भगक्तगंनासाठी दि. १७  पासून सर्व भाविकांना  मोफत महाप्रसाद वअन्नदान होणार आहे.तरी उस्मानाबाद , बीड, लातूर, सोलापूर या  जिल्हयातील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन उस्मानाबाद जिल्हा सेवा समितीचे अध्यक्ष  संतोष केसकर ,उस्मानाबाद जिल्हा युवा अध्यक्ष रामजी सगर ,उस्मानाबाद जिल्हा महिलाध्यक्ष राधाताई गिरी , पीठ लेफ्टनल जनरल अरविंद मोरे , जिल्हा सेवा समितीचे प्रासिध्दी प्रमुख विलास मुळीक यांनी केले.


 
Top