उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तुळजापूर आश्विनी पौर्णिमा-2022 यात्रा दि.09 ते 11 ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये संपन्न होत आहे.  याय आिश्वनी पौर्णिमेनििमत्त सोलापूरसह राज्यातील वििवध भागातून त्याच प्रमाणे आध्र-कर्नाटक-तेलंगणा भागातून लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. या भाविकांसाठी राज्य एसटी महामंडळाने औरंगाबाद विभागातून ९०० बसेस तर पुणे विभागातून ४५० बसेस तुळजापूर येथ्े मागविण्यात आल्या आहेत.
या यात्रा कालावधीमध्ये सोलापूर येथ्ील लाखो भाविक तुळजापूर येथे येत असतात. त्यामुळे सोलापूरसाठी १ हजार ५० बसेसची व्यवस्था करून देण्यात आली आहे. कर्नाटक व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून भाविकांच्या सोयीसाठी मोठ्या प्रमाणात रा.प.बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या बसेसच्या वाहतूकीसाठी पुढीलप्रमाणे केंद्रावरून विविध मार्गावर वेगवेगळी वाहतूक केंद्र उभारण्यात आली आहेत.
 बार्शी आणि उस्मानाबाद मार्गावरील वाहतूकीसाठी तुळजापूर अग्निशमन केंद्रावर शंभर बसेस, सोलापूर मार्गावरील वाहतूकीसाठी तुळजापूर सैनिकी विद्यालय केंद्रावर १ हजार 50 बसेस, कर्नाटक राज्यातील हुमनाबाद आणि गुलबर्गा मार्गावरील वाहतूकीसाठी तुळजापूर नवीन बसस्थानकावर शंभर बसेस आणि लातूर मार्गावरील वाहतूक तसेच ग्रामीण भागातील वाहतूकीसाठी तुळजापूर येथील नवीन बसस्थानकावर शंभर बसेसची सोय करण्यात आली आहे.
 तुळजापूर येथे आश्विनी पौर्णिमेसाठी येणाऱ्या भाविकांनी या सोयीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रा.प.विभाग नियंत्रक यांनी केले आहे.


 
Top