उस्मानाबाद /प्रतिनिधी -

कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा वाढता वापर, यासाठी कुशल मनुष्यबळाचा अभाव व या क्षेत्रातील वाढत्या रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी लक्षात घेऊन आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून १०० कृषी ड्रोन सेवा केंद्र सुरू करण्याच्या उद्देशाने डीजीसीए मान्यता प्राप्त तेरणा कृषी ड्रोन प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय डॉ. पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्या शुभहस्ते दिनांक २६/१०/२०२२ रोजी करण्यात आला.

कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर क्रांतिकारी ठरणारा असून भविष्यात या क्षेत्रात मोठा वाव आहे. पुढील काळात ड्रोन चालवणाऱ्या परवानाधारक पायलटची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासणार आहे. ती पूर्ण करण्यासाठी मा. आ. श्री राणाजगजितसिंहजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डीजीसीए मान्यता प्राप्त  रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (RPTO) ची  स्थापना करण्यात आली आहे. कीटकनाशक फवारणी, मॅपिंग, मल्ट्री स्पेक्ट्रम कॅमेराद्वारे पिकांचे सूक्ष्म निरीक्षण व रोगांचे पूर्वानुमान, जमिनीच्या मूलभूत घटकांचे मुल्यांकन यासाठी ड्रोनचा वापर अतिशय उपयुक्त आहे. केंद्र सरकार कृषी क्षेत्रामध्ये ड्रोन च्या वापराबाबत अतिशय सकारात्मक असून ड्रोन खरेदीला प्रोत्साहन देण्याकरिता विविध घटकांसाठी ४०% ते १००%  अनुदान दिले जात आहे.

तेरणा ट्रस्ट च्या माध्यमातून मराठवाड्यात प्रथमच ग्रामीण क्षेत्रांमध्ये ड्रोन पायलट ट्रेनिंग प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे. कृषी फवारणी मध्ये हे तंत्रज्ञान भविष्यात दीपस्तंभ प्रमाणे काम करेल. जिल्ह्यामध्ये १०० ड्रोन सुविधा केंद्र उभारून संपूर्ण देशामध्ये उस्मानाबाद चे नाव ड्रोन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अव्वल करण्याचा मानस ट्रस्टचे विश्वस्त आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला. ड्रोन प्रशिक्षण केंद्रामध्ये शेतकऱ्यांना, उद्योजकांना व युवक-युवतींना ड्रोन प्रशिक्षण दिले जाणार असून अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सदरील प्रमाणपत्र लायसन्स सारखे काम करणार असून संपूर्ण देशामध्ये ड्रोन उडवण्यासाठी वैध आहे. तसेच वेगवेगळ्या ड्रोन पायलेट साठी हे प्रमाणपत्र वैध असणार आहे.

याप्रसंगी बोलताना तेरणा कारखान्याचे माजी चेअरमन श्री सुरेश देशमुख यांनी मा.डॉ.साहेब यांच्या काळातील सिंचन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेऊन तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या शैक्षणिक, आरोग्य सेवेत सुरु असलेल्या सामाजिक कार्याचा गौरव केला. तसेच कृषी ड्रोन तंत्रज्ञानाच्या साह्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं शेती व्यवस्थापन आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल. मा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रातील वापराच्या धोरणाची अमलबजावणी पूर्ण ताकतीने करण्याची तयारी केली आहे. तसेच राणा दादांच्या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांना उद्योग व्यवसाय उभे करण्यासाठी मदत करण्याच्या अनुषंगाने स्वतंत्र टीम निर्माण केली असून, ही टीम जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून शेकडो तरुण तरुणींना, महिलांना उद्योग उभारणी साठी मदत करीत आहे. कालव्या  ऐवजी बंद पाईप लाईन द्वारे धरणातून थेट शेतात पाणी पुरवठा, पॉलिहाऊस, रेशीम शेतीला चलन असे कृषि क्षेत्रात नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून आधुनिक शेती व तंत्रज्ञानाची कास धरत असलेल्या राणा जगजितसिंह पाटील साहेब यांची त्यांनी अभिनंदन के


प्रास्ताविक पर भाषणात प्राचार्य श्री डॉ व्ही व्ही माने यांनी कृषि ड्रोन प्रशिक्षण केंद्राबाबतची संपूर्ण माहिती दिली. मराठवाड्यातील या पहिल्या वाहिल्या केंद्रामधून सक्षम ड्रोन पायलट निर्माण होतील तसेच या साठीचा कोर्स कालावधी, विद्यार्थ्यांची निवड, ट्रेनिंग साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे या विषयी माहिती दिली. ड्रोन केंद्राचे संचालक जाधव सर यांनी ड्रोनची वैशिष्ट्ये, क्षमता, किंमत, अनुदान उपलब्धता या विषयी विस्तृत माहिती दिली.  यावेळी अहमदपूर येथील प्रगतशील शेतकरी श्री. तुकाराम सुरनर व उपळा (मा.) येथील पदवीधर इंजिनीअर श्री. सत्यजित पडवळ यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री नितीन काळे, विश्वस्त मा.श्री पृथ्वीराज पाटील, विजेंद्र चव्हाण, अशोक शिंदे, युवा नेते श्री मल्हार राणाजगजितसिंह पाटील, सुरेश देशमुख, सुनील काकडे, आबा इंगळे, नाना धत्तुरे, प्रोफ ए झेड पटेल जिल्ह्याच्या विविध भागातून आलेले शेतकरी व तेरणा परिवारातील कर्मचारी उपस्थित होते.

 
Top